पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील श्री भवानी गड संस्थान येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिवपूजन करण्यात आले. तसेच रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी भवानी गड संस्थानचे आणि माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश सुधाकर तांबे, अध्यक्ष मोहित तांबे, भवानी गड संस्थानचे सेवेकरी, वि.का सोसायटी संचालक किसन बापूजी, भिकन भोई, मंगा जावळे, राहुल जोशी, रवी खाडे, आबा मराठे, भरत संत, ऋग्वेद चौधरी, रोहित मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, शिवप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने भवानी गड संस्थानतर्फे शिवचरित्राचे पठण, प्रेरणादायी व्याख्यान आणि शिवकालीन इतिहासावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भवानी गड संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जागर आणि हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले. भवानी गडावर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात शिवप्रतिमेचे पूजन आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले.