अमळनेरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य नव्हते, त्यामुळे कोणत्याही देशाचे संविधान त्या देशाची मानसिकता, इच्छा आणि आकांक्षा लक्षात घेऊन तात्काळ आणि दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन बनवले जाते कारण संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे असे महात्मा फुले हायस्कूल देवगांव ता. अमळनेर येथे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी  ‘माझे संविधान माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.

व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस के महाजन ,एच ओ माळी होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले. शासनाच्या आदेशानुसार 23 ते 26 नोव्हेंबर ‘माझे संविधान माझा अभिमान’ हा उपक्रम शाळेतले सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन यांनी राबवून शाळेतील इयत्ता आठवीतील 7 विद्यार्थी इयत्ता नववीतील 16 विद्यार्थी इयत्ता दहावीतील 8 विद्यार्थी असे एकूण 31 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला.

उत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी भारताचे संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत काहींनी घोषवाक्य व गीत सादर केले तेजस पाटील, धुर्व पाटील ,आदित्य बैसाणे, धम्मदीप बैसाणे,हर्षल पवार, राजश्री पाटील, संजना पाटील ,भाग्यश्री पाटील यांनी संविधानाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर गायत्री पाटील, प्रणाली महाजन या विद्यार्थिनींनी संविधाना विषयी घोषवाक्य सादर केले.

स्नेहल पाटील, हर्षला पाटील, भाग्यश्री पाटील यांनी संविधानावर एक गीत सादर केले.दहावीत वैशाली पाटील हिने संविधनावर कविता सादर केली तर गायत्री पाटील, नंदीनी जाधव, यशस्वी पाटील, रजनी माळी, श्वेता पाटील यांनी संविधनाचे वाचन केले. तर आठवीत भाग्यश्री पाटील, हिमांशू पाटील, प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक एच ओ. माळी यांनी कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आय आर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी मानले.

 

Protected Content