यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जागृत देवस्थान मनुदेवी येथे भक्त निवास बांधणे, चुंचाळे येथे ४ बंधारे, वाघझीरा येथे १ बंधारे व मनुदेवी परिसरात १ बांधाऱ्यासह विविध विकास कामाचे भूमिपूजन चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नांनी विकासकामाच्या माध्यमातून खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या हजारो भक्तांची भक्तनिवासाचे बांधकामानंतर निवासाची मोठी सोय होणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास होऊन परिसरात लहानमोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृउबाचे सभापती तुषार पाटील, शिवसेने यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, आडगाव सरपंच अमिना तडवी, उपसरपंच प्रतिभा पाटील, सुवर्णा पाटील, गोटू सोनवणे, सुभाष साळुंके, दिनेश साळुंके, सुधाकर पाटील, नितीन पाटील, निलेश साळुंके, दीपक कोळी, हरी कोळी, भास्कर पाटील, शांताराम पाटील, प्रकाश कोळी, विनायक पाटील, रशीद तडवी, योगेश पाटील, सूर्यभान पाटील, राजू तडवी, पटवारी आबा, आत्माराम पाटील, संजय कोळी, आशिष झुरकाळे, विनायक पाटील, पुंडलिक पाटील, युवराज पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, गोरख पाटील, संजय कोळी, सीताराम साळुंखे, जीवन वाणी, मोहन न्हावी, सचिन पाटील, सुनील पाटील, सिकंदर तडवी, शशिकांत शिंदे, संजय कोळी तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.