जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पाटील यांचा वाढदिवस शनिवारी (९ ऑगस्ट) असून, त्यानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर आणि डीन डॉ. प्रशांत सोळंके होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा. डॉ. धनंजय बोरोले, प्रवीण कोल्हे, राहुल गिरी, चेतन चौधरी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी १० वाजता वैद्यकीय महाविद्यालयात मुख्य सत्कार कार्यक्रम होणार असून, यासोबतच रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप आणि वृक्षारोपण मोहीम यांसारखे समाजोपयोगी उपक्रमही राबवले जाणार आहेत.
या सत्कार समारंभात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे ऑनलाईन पद्धतीने संबोधन करणार आहेत. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने सर्व नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



