Home आरोग्य उद्या जागतिक मानसिक आरोग्य दिननिमित्त विविध उपक्रम

उद्या जागतिक मानसिक आरोग्य दिननिमित्त विविध उपक्रम


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (10 ऑक्टोबर ) रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस व महिना जनजागृती म्हणून सामान्य रुग्णालयाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकिस्थक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मानसिक आरोग्य पथकामार्फत राबविण्यात येत आहे. या पथकांद्वारे शाळा, महाविद्यालय, बचत गट, शेतकरी,, वृद्धाश्रम, बेघर निवारा, व्यसनमुक्ती केंद्र अशा विविध ठिकाणी जनजागृती करून समुपदेशन कार्यशाळा घेण्यात येतात. तसेच दरवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षाकाठी 18 हजार 500 पेक्षा अधिक रुग्णांना मोफत औषधोपचार दिला जात आहे. त्यामध्ये सर्वच क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे.

मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण बेरोजगारी, व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिरेक वापर, कुटुंबातील संवाद कमी होणे, विद्यार्थ्यांमधील परीक्षा बाबतची भीती व तणाव, उदासीनता, नैराश्य ह्याचे झपाट्याने प्रमाण वाढत आहे.

मानसिक आरोग्याच्या पथकामध्ये मानसोपचार तज्ञ तज्ञ मानसशास्त्रज्ञ समुपदेशक नर्स माध्यमातून रुग्णांना औषधोपचार समुपदेशन गृहभेटी, फोन माध्यमातून त्यांच्याशी संवादामुळे जिल्ह्यातील 17 हजारापेक्षा जास्त रुग्ण औषध उपचार घेऊन पूर्ववत कामकाज करत आहे. कोणतेही मानसिक आजारी व्यक्ती ही नियमित औषध उपचाराने आणि समुपदेशनाने बरी होऊ शकते. जिल्हा मानसिक आरोग्य पथकामार्फत टीले मानस 14 4 16 टोल फ्री नंबर वरती समुपदेशन केले जाते.

मानसिक आरोग्याचे घोषवाक्य सेवामध्ये प्रवेश -आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य
घोषवाक्य चाचणी संपूर्ण महिनाभर जिल्हा मानसिक आरोग्य पथक जनजागृती पर कार्यशाळा व्याख्याने मार्गदर्शने सत्र आयोजित करण्यात आले आहे. तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पथकाच्या मार्फत औषधोपचार व समुपदेशन केले जात आहे.


Protected Content

Play sound