वर्धा | भरधाव वेगाने धावणार्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट नदीत कोसळून झालेल्या अपघातात सात जण मृत्यूमुखी पडले असून ते सर्व जण वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, एक एसयुव्ही नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलं.
जवळपास ४० फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. पहाटे चार वाजेपर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. हे सर्वजण मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.