Home Cities जामनेर सोमवारी जामनेर शहरातील त्रिनेत्र गिताई सेवा संस्था संचलित ‘व्दारका अन्नछत्रालय’चा शुभारंभ

सोमवारी जामनेर शहरातील त्रिनेत्र गिताई सेवा संस्था संचलित ‘व्दारका अन्नछत्रालय’चा शुभारंभ

0
45


 

जामनेर, प्रतिनिधी | शहरातील त्रिनेत्र गिताई सेवा संस्था संचलित द्वारका अन्न छत्रालय या सेवा केंद्राचा शुभारंभ नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा.  नगर परिषद चौक या ठिकाणी होणार आहे.

 त्रिनेत्र गिताई सेवा संस्थेने गोर-गरीब गरजु व रुग्णांच्या सेवेसाठी ‘द्वारका अन्नछत्रालय’ द्वारे हा सेवाभावी उपक्रम सुरु केला आहे. या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या धान्य-मसाल्यांचा उपयोग करून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर फक्त २५ रुपयांमध्ये स्वादिष्ट जेवणाची पार्सल सेवा देण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound