पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन, संघटन आणि जनजागृती अत्यंत आवश्यक असून याच उद्देशाने “प्रबोधन पर्व” या संकल्पनेतून वाणी समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पारोळा शहरातील वाणी मंगल कार्यालय येथे लाडशाखीय वाणी समाज मंडळ व अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची तालुका व शहर मंडळ तसेच महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास नवर्निवाचित नगरसेविका निर्मला अशोक शिरोळे, वंदना गोविंद शिरोळे, भुषण प्रकाश टिपरे, अमोल गोविंद शिरोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र शेवाळकर, अनिल मालपुरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे ओबीसी प्रणेते व आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सुनिल नेरकर यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत भविष्यातील ध्येय, धोरणे आणि समाजहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सदस्य अजय कासोदेकर, राज्याध्यक्ष रविंद्र मालपुरे, प्रदेश कार्यवाहक भुषण सोनजे, जिल्हाध्यक्ष प्रा. भागवत मालपुरे, जीवन परिवर्तन समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता सुधाकर पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालपुरे, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता महालपुरे, पारोळा तालुका अध्यक्ष हेमकांत मुसळे, पाचोरा राकेश शिरोळे, भडगाव निलेश येवले, पारोळा तालुका अध्यक्षा पुष्पा भोकरे यांचा समावेश होता. सत्कारानंतर सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित केली.
समाज अध्यक्ष विजय नावरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत प्रबोधन पर्वाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची पुरुष व महिला तालुका तसेच शहर कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली, ज्यामुळे समाज संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाडशाखीय वाणी समाज मंडळ तसेच प्रबोधन पुरुष व महिला मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मद्र शिरोळे सर व शरद मेखे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन देविदास तिसे यांनी केले.



