मुक्ताईनगर Muktainagar-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील प्रवर्तन चौकात तोडफोड करत धुडगुस घालणार्या एकाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील प्रमुख आणि अतिशय महत्वाचे स्थळ असणार्या प्रवर्तन चौकात आज सायंकाळी सहाच्या सुमारास एक व्यक्ती महापुरूषांच्या स्मारकावर बुटांसह चढला. त्याने या ठिकाणी तोडफोड करत आक्षेपार्ह टिपण्णी केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विचारपूस केली असता सदर व्यक्ती हा सालबर्डी भागातील चंद्रकांत भगवान पाटील ( वय ३३) हा व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.
या व्यक्तीच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गोकुळ भावराव बोदडे ( रा. मुक्ताईनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम २९४, २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले. मात्र सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत चंद्रकांत भगवान पाटील याला अटक केली आहे. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, या व्यक्ती पोलिसांशी देखील असभ्य आणि असंबध्द भाषेत बोलत असल्याचे समजते.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरिक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश गोविंदा महाजन हे करीत आहेत.