मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव नाकारत उमेदवार उभे केले. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मते आणि जाहीर झालेले निकाल तपासल्यास वंचितने घेतलेल्या मतांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसते. त्यामुळे भाजपच्या फायद्यासाठीच वंचित आघाडी मैदानात उतरल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडले आहे.
या संदर्भात अधिक असे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा मेळावा राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना शरद पवार म्हणाले की, राज्यात वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष उदयास आला असून त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याचे सांगत वंचित आघाडी हा पक्ष भाजपला फायदा करून देण्यासाठीच मैदानात त्याचबरोबर राज्यातील जनतेने वंचितपासून सावध व्हावे, असे आवाहन पवार यांनी केले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही वंचितमुळे मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसण्याची शक्यता आहे.