यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील जे.टी. महाजन इंग्लिश स्कुल व यावल तालुका विधी सेवा समिती आणि यावल तालुका वकील संघांच्या वतीने सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या सेवा शिबीराच्या कार्यक्रमा प्रसंगी विधी सेवासंबंधी सेवा कार्य समितीचे कार्य व आपण आपले संरक्षण कश्या प्रकारे करू शकतो पाणी बचत विषयी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थींना महिती दिली तसेच Bad- Good Touch बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याप्रंसगी विधी सेवा समिती मार्फत आलेले पर्यवेशक तडवी, समांतर विधी सहाय्यक शंशिकांत वारुळकर, अजय बढे, हेंमत फेगडे आदी उपस्थित होते.
याप्रंसगी शाळेच्या प्रार्चाया रंजना महाजन व सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार शाळेच्या शिक्षिका राजश्री लोखंडे यानी मानले.