जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडणारी आणि त्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची’ एक महत्त्वाची बैठक येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे संपन्न होणार आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.

जळगाव शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे दुपारी १ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पत्रकारितेसमोरील वाढती आव्हाने आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्याची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.

या बैठकीला संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष रवींद्र पवार, सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, केंद्रीय सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी आणि जोशीला पगारिया यांसह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण पत्रकारांचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित होणे काळाची गरज आहे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे



