
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली विनय भावे यांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. याच अनुषंगाने, आज गुरूवारी त्यांनी धरणगाव शहरातील वार्ड क्रमांक सहा मधील वेगवेगळ्या भागांना भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

सकाळपासून सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्यात वैशाली भावे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी आपुलकीने विचारपूस करून चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मूलभूत आणि दैनंदिन समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.
वैशाली भावे यांच्यासोबत प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार तसेच महाराष्ट्र जनविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ‘जनविकास आघाडी’च्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण वॉर्डात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. नागरिकांनीही उमेदवारांचे स्वागत करत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक पातळीवरील समस्यांवर भर देत आणि जनसंवादातून लोकांपर्यंत पोहोचत, वैशाली भावे या निवडणुकीत आपला मजबूत दावा सादर करत आहेत. महाराष्ट्र जनविकास आघाडीला धरणगाव शहराच्या विकासाची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.



