चोपडा प्रतिनिधी । ज्या गावात पाणी आणि झाड आहे ते गाव समृध्द अशी ओळख राहील, वर्डी गावाने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवावा अशी माझी इच्छा आहे, असे गौरवोद्गार माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
वर्डी येथे चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भारतीय जैन संघटना शाखा चोपडा व लोकवर्गणीतून नालाखोलीकरण जुलै महिन्यात करण्यात आले होते. त्या नाल्यात नुकताच पाऊस झाला. त्यात ते १०० टक्के पाणी भरून ओव्हर फोलो झाले आहेत. आज 14 ऑगस्ट रोजी जलपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, झाड म्हणजे वसुंधराला लाभलेला अलंकार होय. झाड लावणे म्हणजे पृथ्वीला कन्यादान केल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रत्येक घरासमोर एक झाड लावायला हवे. तसेच ‘पाणी आडवा पाणी जिरवा’साठी रेनहार्वस्टिंग करणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी पैसा पाणी आणू शकत होता मात्र आता चित्र उलटे झाले आहे. आता ज्यांच्याकडे पाणी तो केव्हा ही पैसा कमवू शकतो. शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात शेततळे करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा नालाखोलीकरण केले तर वर्डीच्या ग्रामस्थाना महत्त्व समजले असे प्रत्येक गावाने करावे असे मौलिक विचार प्रा अरुणभाई गुजराथी वर्डी येथील उनपदेव रोडवरील महादेवच्या मंदिराच्या प्रागणात झालेल्या सभेत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, पीपल्स बँकचे संचालक मोरेश्वर देसाई, डी.पी.साळुंखे, चोसकाचे चेअरमन अतुल पाटील, सरपंच विनायक पाटील, पं.स.चे माजी सभापती कांतीलाल पाटील, व्यावसायिक अशोक अग्रवाल, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचीव दिनेश लोडाया, जिल्हाउपाध्यक्ष शांतीलाल कोचर, विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन आदी उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यां तर्फ़े डॉ.कांतीलाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय पाटील, पोलीस पाटील पदमाकर नाथ, विश्वासराव पाटील, डॉ. वाय.एस.वाणी, डॉ. सुखदेव पाटील, काशिनाथ पाटील, मनोज चव्हाण, महेंद्र पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, मंगल पाटील, लहुशकुमार धनगर, राजेंद्र देशमुख, हिम्मतराव शिंदे, धर्मराज पाटील, रमाकांत पाटील, शरद धनगर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.