चोपडा प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र प्रति पंढरपुर म्हटले जाणारे तालुक्यातील वढोदा गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री पांडुरंगाची महापूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते सकाळी 6.30 वा विधिवत पूजनाने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्याहस्ते सपत्नीक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची महापूजा करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, प्रांताधिकारी सीमा अहिरे, चंद्रहास गुजराथी, घनशाम पाटील आशीष गुजराथी, दिलीप युवराज पाटील, तहसीलदार अनिल गावीत, जगनकाका पाटील, डी.पी.पाटील, अतुल ठाकरे, गिरिश पाटील, नंदुआबा पाटील, जीवन चौधरी हिम्मतसिंग पाटील, नेमीचंद जैन, राजू देशमुख, हुसेनखा पठान आदि मान्यवर हजर होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक वढोदा गावचे रहिवासी गोकुळ पंढरीनाथ पाटील, विठ्ठल मंदिर समिती, विनायक मित्र मंडळ व वढोदा ग्रामस्थ यांनी सुंदर नियोजन केले माउली पूजन, काकड़ आरती, भजन यासह विविध मांगलिक कार्यक्रमानी गावात उत्साहाचे, वातावरण तयार झाले. तदनंतर गोकुळ आबा यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख अतिथि यांना उपवासाचा फराळ देण्यात आला.
शेठ नटवरलाल गुजराथी इंग्लिश मीडियम शाळेचे भूमिपूजन
यावेळी घोडगाव येथे सी.बी.निकुंभ हाईस्कूलच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकने यांच्याहस्ते नियोजित शेठ नटवरलाल गुजराथी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसगी घोड़गाव पंचक्रोशीतील नागरिक, संस्थेचे संचालक मंडळ मोठ्या प्रमानात हजर होते.