फैजपूर म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आजपासून लसीकरणाला सुरुवात

फैजपूर, प्रतिनिधी । फैजपूर शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरण आजपासून आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते लसीकरण सुरु करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी २०० नागरिकांनी लसींचा लाभ घेतला.

 

फैजपूर शहाराची लोकसंख्या ४० हजारापेक्षा जास्त असल्याने याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक होते. यासाठी याविषयी पालिकेतर्फे नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, गटनेते मिलिंद वाघूळदे, जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती.

 

आ. शिरीष चौधरी यांनी फैजपूर येथे लसीकरण लवकरच सुरू करावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोजीराव चव्हाण यांच्याकडे तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली व फैजपूर शहर व परिसरातील नागरिकांना लसीकरण व्हावे व पुरेसा डॉक्टर, नर्स स्टॉप पुरववा व पालिकेकडे रुग्णालयात पुरेसा डॉक्टर व नर्स स्टॉप नसल्याने जिल्हा स्तरावर स्टॉप उपलब्ध करावा अश्या सूचना दिल्या मात्र जिल्हा शल्यचिकित्सककडे स्टॉप उपलब्ध नसल्याने आ. शिरीष चौधरी यांनी फैजपूर शहरातील आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. शैलेश खाचणे यांच्याशी चर्चा केली. आणि आज गुरुवारी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग, नगराध्यक्षा सौ महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सातपुडा अर्बन पतसंस्था व्हा चेअरमन चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे, अमोल निंबाळे, नगरसेविका शकुंतला भारंबे, रवींद्र होले, जितेंद्र भारंबे, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, म्युनिसिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक एस ओ सराफ आदी उपस्थित होते. 

 

लसीकरणाचे काम आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. शैलेश खाचणे यांच्या स्टॉपकडून केले जात असून आज पहिल्या दिवशी उपनगराध्यक्षा नयना चौधरी, मिलिंद वाघूळदे यांनी लस घेतली. त्यांच्यासह २०० नागरिकांनी लसीचा लाभ घेतला. फैजपूर शहरातच लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याविषयी शहरवासीयांच्या व पालिकेच्यावतीने आ. शिरीष चौधरी यांचे आभार भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी मानले.

Protected Content