जळगाव प्रतिनिधी । शहरातील व.वा. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनोद अग्रवाल यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रदीप जोशी व अॅड. सुशील अत्रे यांची निवड जाहीर करण्यात आली.
व. वा. वाचनालयाची १४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात झाली. यात तीन वर्षासाठी अध्यक्षपदी विनोद अग्रवाल यांची तर उपाध्यक्षपदी डॉ. प्रदीप जोशी, अॅड. सुशील अत्रे यांची बिनविरोध निवड झाली. यंदाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार ज्ञानदेव वाणी यांना देण्यात आला. यासह आगामी निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी नेमणे यासह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
कार्याध्यक्ष अॅड. प्रताप निकम यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा मांडला. देणगीच्या व्याजातून दिला जाणारा उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार विनोद अग्रवाल, प्रा. चारूदत्त गोखले, प्रा. वसंत सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. चिटणीस मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे इतिवृत्त वाचन केले. अनिल कुमार शाह यांनी वार्षीक अहवाल ताळेबंद मांडला.