Home राजकीय उत्तम जानकर आमदार पदाचा राजीनामा देणार

उत्तम जानकर आमदार पदाचा राजीनामा देणार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. तसेच यावरून उत्तम जानकर यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. यानंतर आता उत्तम जानकर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

आता आमदार उत्तम जानकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. “२३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound