पणजी वृत्तसंस्था । गोव्यातील १० काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
गोव्यातील १० काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता गोव्यातील सरकार भक्कम झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, पक्षातील आयारामांचा हा प्रवेश अनेक नेत्यांच्या पचनी पडलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी या प्रकरणी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, १७ मार्च रोजी माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या मार्गाचाही शेवट झाला आहे. आता गोवा भाजप ज्या दिशेने चालली आहे तो योग्य नसल्याची टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.