रावेर, प्रतिनिधी | येथील रेल्वे स्टेशनवर विविध प्रकारची नूतनी करणाची कामे सुरु असून रेल्वे स्टेशन लवकरच कात टाकणार आहे. मात्र या कामांमध्ये वापरण्यात येणा-या निकृष्ट वाळूचा विषय परीसरात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
भुसावळ विभागात येणाऱ्या येथील रेल्वे स्टेशनवर नूतनी करणाची विविध कामे प्रगती पथावर आहेत. परंतु यामध्ये वापरण्यात येणारी वाळू अत्यंत निकृष्ट दर्जाची दिसत आहे. वाळूच्या दर्जाकडे बघून लक्षात येते की, वाळू कोणत्या नदीतली नसून नाल्या-खो-यातुन आणली असावी. तरी रेल्वेच्या जबाबदार वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.