Home राजकीय उर्मिला मातोंडकर काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून लढणार

उर्मिला मातोंडकर काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून लढणार



मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेसने उर्मिला हिला लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी उर्मिलाने पक्षप्रवेश केला होता. बॉलिवूडमधून राजकारणात एन्ट्री करणाऱ्या उर्मिलाला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसने तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात तिची लढत असणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. आता काँग्रेसने उर्मिलाला रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे. दरम्यान,उत्तर-मुंबईतील गुजराती मतदारांचा भाजपला सपोर्ट आहे. त्यात काँग्रेसने उर्मिलाच्या रुपात मराठी उमेदवार दिला आहे. उर्मिला ही बॉलिवूड अभिनेत्री असल्याने लाभ मिळेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound