उर्मिलासमोर अश्लिल नृत्य ; भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार

मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अश्लिल नाच केल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

बोरिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात आज सकाळी उर्मिला मातोंडकर काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात प्रचार करत होत्या. त्याचवेळी भाजपचे काही कार्यकर्तेही तिथे आले. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याकडे पाहून अश्लिल हावभाव केले. वेडावाकडा नाच केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एका प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर उर्मिला यांनी भाजपच्या विरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारीची नोंद केली.

Add Comment

Protected Content