धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात गटारी, रस्ते, पथदिवे, चोरट्यांचा उच्छाद, पाणी यासह इतर मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरीकांचे मोठे हाल होत आहे. या सुविधा तातडीने पुर्ण कराव्यात या मागणीसाठी धरणगाव विकास मंचच्या वतीने गुरूवार ४ एप्रिल रोजी धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव शहरात सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे केले आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. यामुळे लहानमोठे अपघात होत आहे. दुसरीकडे खड्डे असल्याने धुळेमुळे नागरीकांना आणि वृध्दांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागला आहे. अशुध्द स्वरूपात होणारा पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारींची स्वच्छता नसल्याचे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचा उच्छाद वाढला आहे. यासह शहरात असलेल्या इतर समस्या वाढल्या आहे. त्यामुळे नागरीपालिका प्रशासनाने या सुविधा तातडीने सोडवाव्यात अशी मागणीचे निवेदन धरणगाव विकास मंचच्या वतीने गुरूवार ४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनावर गोरख देशमुख, राजेंद्र वाघ, प्रमोद पाटील, राहूल जैन, लक्ष्मणराव पाटील, भरत शिरसाठ, मयुर भामरे, ललीत मराठे, सागर वाजपेयी, नंदलाल माळी, रामचंद्र माळी, अरूण शिंदे, सागर पाटील, राहूल पाटील, अरविंद ओस्तवाल, दिनेश भदाणे, व्रिकम पाटील यांच्यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.