जळगाव प्रतिनिधी । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवसाच्या जिल्हा दौर्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. आज दुपारी जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवसाच्या जिल्हा दौर्यावर आले असून पहिल्यांदा ते प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. यानंतर ते जळगाव महापालिकेत भेट देणार आहेत.
यानंतर ना. एकनाथ शिंदे हे पाचोरा-भडगावातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. यात भडगावमध्ये नगरपालिकेने बांधलेल्या शेठ बख्तावरमल चोरडिया अभ्यासिकेचे लोकार्पण; घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमांना हजेरी लावल्यावर ते बाळद रोडवरील साई मंदिरात दर्शन घेणार आहेत. यानंतर ना. शिंदे यांच्या हस्ते पाचोरा येथील सार्वजनीक वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण; कृष्णपुरी, स्मशानभूमि जवळ आणि पांचाळेश्वर मंदिराजवळ हिवरा नदीवरील पुलांचे भूमिपुजन आणि स्व. मंत्री के.एम. बापू पाटील व्यापारी संकुल भाजी मंडईचे लोकार्पण होणार आहे. यानंतर ना. एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावरून मुंबई येथे रवाना होणार आहेत.