अडावद प्रतिनिधी । श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र उनपदेव यात्रा पौष संपूर्णमहिन्यात भरत असते या यात्रेचा शुभारंभ आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते गोमुख पूजन व ध्वजारोहण करून करण्यात आला. यावेळी त्यांनी या क्षेत्राला पर्यटन विकासात अग्रगण्य स्थान मिळवून देण्यासाठी चार कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले.
२७ रोजी सकाळी ११ वाजता आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे, वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिनीताई प्रकाश पाटील यांच्या हस्ते गोमुखाचे पुजन व ध्वजपूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या बगीच्यांची पाहणी करून आमदार लताताई यांनी संगीतले की, यापूर्वी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. त्यात यापुढे सातत्य राहीन. या तिर्थक्षेत्रांस पर्यटन दर्जा प्राप्त करून देऊ, शासनाकडे या तीर्थक्षेत्र विकासासाठी चार कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल व हे क्षेत्र नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती एम. व्ही. पाटील, लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, माजी पंचायत समिती सभापती माणिकराव महाजन धानोरा, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख मंगला पाटील, गटविकास अधिकारी गौतम कसोदे, सपोनि योगेश तांदळे, सहायक वनसंरक्षक व्ही.एच.पवार, वनक्षेत्रपाल व्ही. टी. पदमोर, महावितरणचे सहायक अभियंता पंकज बाविस्कर, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष साखलाल महाजन, वडगावचे सरपंच नामदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी बापू कोळी, उपसरपंच फकीरा तडवी, ग्रामपंचायत सदस्य हनुमान महाजन, आसाराम कोळी, जावेद खान, अलताब पठाण, अमीनरजा मण्यार, भारती महाजन, मंगलाताई कोळी, सविता रामकृष्ण महाजन, वंदना संजय महाजन, सिंधूबाई यासु बारेला, मु.ना.पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, बापु कोळी, लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ, शांताराम पवार, मनोहर देशमुख, रामकृष्ण महाजन, वासुदेव महाजन, नरेंद्र खांबायत, सचिन महाजन, अलियारखा पठाण, गुलाब बारेला, कालू मिस्तरी, वनपाल राकेश खैरनार, वनरक्षक खलील शेख, के.एल.महाजन, विपुल पाटील, कपिल पाटील, योगेश सोनवणे, आर ए भुतेकर, वनश्री दशरथ पाटील, राहुल बैरागी, गणेश भोईटे, हे उपस्थीत होते. तसेच प्रास्ताविक वनक्षेत्रपाल व्ही.टी. पदमोर यांनी तर सूत्रसंचालन पी डी चौधरी व आभार पी आर माळी यांनी व्यक्त केले.