जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बहुप्रतिक्षेत असलेल्या पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते दुपारी साडेबारा वाजता अनावरण करण्यात आले. यावेळी अतिशय जल्लोषाच्या वातावरणात पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते अंबादास दावने, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून पिंप्राळा वासियांची मागणीला यश आले असून अनावरण प्रसंगी परिसरातील नागरीकांसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने गर्दी असल्याचे पहायला मिळाले. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मानराज पार्क येथील सभेला उपस्थिती दिली. यावेळी जिल्ह्यातील नागरीक, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे.