यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथे आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यात पहाटे ५ ते ६ काकड आरती दुपारी १ ते ४ संगीत श्रीराम कथा प्रवक्ते श्रीराम महाराज उंटावद तसेच सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०:३० किर्तनाचा कार्येक्रम होणार असुन आज गुरुवार दि.१० रोजी दुपारी महाप्रसादाचा कार्येक्रम तर सायंकाळी ४ ते ६ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या संकीर्तन सप्ताह दरम्यान दि. ३ रोजी ह.भ.प.भागवताचार्य भागवत महाराज जळगावकर दि.४ ह.भ.प.विनोदाचार्य राजेंद्र महाराज कासदेकर दि.५ रोजी ह.भ.प.विकास महाराज मोरदड दि.६ रोजी ह.भ.प.मुकुंद महाराज ढेकूकर दि.७ रोजी ह.भ.प.शांतीमूर्ती दीपक महाराज रेलकर दि.८ रोजी ह.भ.प राजेंद्र महाराज अध्यक्ष मुक्ताई शिक्षण संस्था पिंपळकोठा दि.९ रोजी ह.भ.प.शब्दप्रभू पोपट महाराज कासारखेडेकर तर दि.१० रोजी ह.भ. प.भागवताचार्य सदाशिव महाराज साखरेकर यांच्या काल्याचे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.
या संकिर्तन सप्ताहादरम्यान दीपक महाराज कोळी, नारायण महाराज, शाहूदू महाराज, बाळू महाराज चिंचोली पिंटू महाराज, शाम महाराज, भगवान महाराज, एकनाथ महाराज, साहेबराव महाराज, रेवा महाराज डांभुर्णी धर्मा महाराज आडगाव, मधु महाराज डोणगाव, लिलाधर महाराज किनगाव, नरेश महाराज, महेश महाराज, सोनू महाराज गायनाचार्य म्हणून तर मृदंगाचार्य म्हणून ह.भ. प.जनार्दन महाराज पिंपरी, आशिष महाराज, पंकज महाराज उंटावद विशाल महाराज, शिवदास महाराज,आडगाव दगडू महाराज धानोरा,प्रकाश महाराज किनगाव, हेमंत महाराज कोळन्हावी, हार्मोनियम वादक म्हणून ह.भ.प.हिलाल महाराज करमाड, भोजराज महाराज आडगाव, विणेकरी म्हणून ललित महाराज, विश्वेश महाराज, वैभव महाराज, किरण महाराज उंटावद यांचे सहकार्य लाभणार तरी भावीकांनी या संकिर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.