धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील भवरखेडे विवरे गृप ग्रामपंचायत सरपंचपदी सुनंदाबाई पुंडलिक माळी यांची बिनविरोध नुकतीच निवड करण्यात आली. तात्कालिन सरपंच योगीता शामकांत पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनंदा माळींची बिनविरोध निवड झाली.
सुनंदाबाई माळी यांची सरपंचपदी बिनविरोध निवडीबद्दल माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अँड. रविंद्रभैय्या पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी (सर), उपजिल्हा अध्यक्ष दिपक वाघमारे मोहन नाना, माजी जिल्हा पषिद सदस्य रविंद्र पाटील, नाटेश्वर पवार आदींनी अभिनंदन केले. भवरखेडे विवरे गृप ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी विरेंद्र सोनकांबळे व ग्रामसेवकसंजय पाटील आदींनी काम पाहिले. त्यांच्या निवडीसाठी पॅनल प्रमुख गोकुळ पाटील, धनराज माळी , सखाराम पाटील, कृष्णकांत पाटील, गुलाब पाटील, शाम पाटील, गणेश पाटील, पुंडलिक पाटील, किरण पाटील, सुभाष पाटील दिलीप पाटील, शालिक पाटील, धनराज पाटील व राजू महाजन आदींनी सहकार्य केले. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. सुनंदा माळी यांचे समस्त विवरे व भवरखेडे ग्रमस्थानी अभिनंदन केले.