नाशिक (वृत्तसंस्था) आचारसंहिता लागू झालेली असताना कोणतीही परवानगी न घेता येवला तहसील कार्यालयात उपोषण केल्याप्रकरणी पोलिसांकडून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नऊ जणांनी येवला तहसील कार्यलयाच्या आवारात उपोषण सुरु केले होते. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणकर्त्यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या आनंदा पानसरे, गणेश बगाटे, रावसाहेब शिंदे, बाळू जोंधळे, आनंदा सोनावणे, सुनिता जोंधळे, बाबासाहेब शिंदे, राजाराम पानसरे, बबन शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण येवला तालुक्यातील मुरमी या गावाचे रहिवाशी आहेत.