साकेगाव उपसरपंचपदी माधुरी पवार यांची बिनविरोध निवड

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ-तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. या निवडणुकीत उपसरपंचपदी माधुरी पवार यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीत सागर सोनवल यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा शनिवारी २० जुलै रोजी दिला होता. त्यानंतर उपसरपंच पद हे रिक्त होते. त्यानुसार रिक्तपदासाठी शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता साकेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात उपसरपंचपदी माधुरी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी सरपंच हिराबाई कोळी, ग्रामपंचायत सदस्य आनंद ठाकरे, गजानन पवार विलास ठोके, ग्रामसेवक विजय पाटील, शकील पटेल यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. माधुरी पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांचा ग्रामसेवक विजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content