चाळीसगाव प्रतिनिधी । भाजप तालुका शहर बूथ प्रमुख, पेज प्रमुख, मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्र यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक शहरातील नवजीवन सिंधी सेवा मंडळाच्या बजाज स्मृती हॉलमध्ये दूपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी ग्रामीण नोंदणी प्रमुखपदी माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, सह प्रमुख डॉ. महेंद्र बोरसे, शहर नोंदणी प्रमुख अड.प्रशांत पालवे, सहप्रमुख प्रा. सचिन दायमा यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला यांची होती उपस्थिती
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील, जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प. सदस्या मंगलाताई जाधव, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, पं.स.सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सुरेश हीगोनेकर, ॲड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, धनजय मांडोळे, प्रा. सुनील निकम, अनिल नागरे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सुर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे. उमंग महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील, माजी अध्यक्ष लालचंद बजाज ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला उत्तुंग यश- खा.उन्मेष पाटील
केंद्रात नरेंद्र मोदींचे सक्षम नेतृत्व गोरगरिबांसाठी नवनवीन योजना राबवित आहे. तर राज्यात देंवेद्र फडणवीस यांनी अनेक विकासाची कामे पूर्ण केली तसेच गेल्या साडे चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण दिले. यासह जनतेच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. यामुळे जनतेला दिसतोय फरक म्हणून शिवशाही येणार परत तसेच सुरक्षित महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र ही घोषणा पक्षाने दिली आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे हे विसरून चालणार नाही.राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ता करतो आहे. येत्या काळात जोमाने सर्वसामान्य माणसाला तसेच युवा नव मतदारांना आणि महिलांना सहभागी करून घ्यावे. आजपर्यंत शासनाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या त्यांच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तन मन धनाने कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच चाळीसगाव शहर व तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे संघटन जिल्ह्यात क्रमांक एक वर आहे हे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने मेहनत घ्यावी. सर्व घटकांना योग्य न्याय देणारे सरकार राज्यात पुन्हा यावे आणि पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका अगोदर आपण पक्ष मजबूत करण्यासाठी नक्कीच परिश्रम घ्यावेत, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सरचिटणीस सदाशिव पाटील, सभापती पोपट भोळे यांनी सभासद नोंदणी प्रक्रिया बाबत माहिती दिली. पक्षाच्या विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी सडेतोड मत मांडत पक्षाच्या ध्येय धोरणे समजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचविण्यासाठी परिश्रम घ्यावेत आणि तालुका मोठा असल्याने प्रत्येक बूथ वर शंभर नवमतदार जोडण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले की, मी गेले दहा वर्षे कार्यकर्त्यांसारखा नेत्यांच्या समोर बसलेला होतो मात्र पक्षाची प्रामाणिक सेवा केली. तेव्हा आज जिल्हाध्यक्ष पदाची संधी मला पक्षाने दिली मित्रानो आपण देखील मतदार जोडणी आभियान यशस्वी करा, कुठलीही बेशिस्ती पक्षात खपवून घेतली जाणार नाही, असे ही ते म्हणाले. सूत्र संचालन प्रा.सुनील निकम तर आभार अमोल नानकर यांनी मानले. मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक के.बी.दादा साळुंखे यांनी केले. त्यांनी पक्षाच्या आजवर झालेल्या विस्ताराचे विवेचन केले.