अमळनेर (वृत्तसंस्था) जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आणि राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील या दोघांची आज अमळनेरात भेट घडली. दोघांची झालेली भेट बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत राजकीय चर्चेच्या गंमतीजमतीपर गप्पा केल्या. गुढीपाड्व्यानिमित्त आज अमळनेरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी दोघांची भेट झाली.
साडे तीन मुहर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडवा निमित्त आज शहरात शोभायात्रा व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक संघटनाच्या पदाधिकारी, भाविक नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापासून भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील सहभागी झाले होते. यावेळी उन्मेश दादा पाटील यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये छान गप्पा रंगल्या. दोघांनीही राजकीय चर्चेच्या माध्यमातून हास्य विनोद केला.
दरम्यान, बाजारपेठेत महायुतीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. आमदार उन्मेष पाटील यांच्या सोबत अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी.एस पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील,माजी कुलगुरू प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील, माजी भाजप शहराध्यक्ष लालचंद सैनानी,शिवसेनेचे डॉ. राजेंद्र पिंगळे, नितीन निळे, दीपक चौगुले,बजरंग सेठ अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, गजेंद्र पाटील, निरज अग्रवाल, किरण पाटील, हरचंद लांडगे, मच्छिंद्र लाडंगे, बाळासाहेब सदांनशिव,जेष्ठ व्यापारी शामशेठ लुल्ला, माजी नगराध्यक्ष गोविंद शेठ अग्रवाल, नगरसेवक निशांत अग्रवाल,उमविचे सिनेट सदस्य दिनेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आमदार उन्मेषदादा पाटील यांना अमळनेरकरांकडून एक लाखांचे मताधिक्य देऊ, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. शोभायात्रेत अनेक आध्यत्मिक व वारकरी मंडळ देखील सहभागी होते. उन्मेष पाटील यांचे सुभाष चौक, बाजार पेठ, राणी लक्ष्मीबाई चौकात जागोजागी स्वागत करण्यात आले. यावेळी चाळीसगाव येथील नगरसेवक नीतीन पाटील , तालुका बूथ समन्वयक गिरीश बऱ्हाटे त्यांच्या सोबत होते.