Home क्राईम बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सात जण अटकेत

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सात जण अटकेत


सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बार्शी शहर पोलीसांना यश आले आहे. यात पाच लाख रूपयांच्या नोटांसह सात जणांना पोलीसांनी अटक केली आहो. मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापाऱ्यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्न करत असतांना दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

सुनील चंद्रसेन कोथिंबिरे (वय-२३, रा. माळी नगर, अंबाजोगाई, जि. बीड) आणि आदित्य धनंजय सातभाई (वय-२२,रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी वैजिनाथ जि. बीड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या संशयित आरोपीकडे २ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर खदीर जमाल शेख (वय-३१, रा. मिरवट, ता. परळी, जि. बीड), विजय सुधाकर वाघमारे (वय-३२, रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी, जि. बीड) यांच्याकडून या नोटा घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे ६ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढलून आल्या. त्यामुळे पोलिसांनी यांना देखील अटक केली.

 

या आरोपीची चौकशी केली असता त्यांनी या बनावट नोटा नितीन ऊर्फ आप्पा जगन्नाथ बगाडे (वय-५०, रा. शामगाव, ता. कराड, जि. सातारा), जमीर मोहमंद सय्यद (वय-४०, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा, नाशिक) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. मा

 

बनावट नोटा मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटी गावच्या तरुणाच्या घरात या नोटा प्रीटिंग करत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ येथील ललित चंद्रशेखर व्होरा (वय-२६, रा. चिंचोलीकाटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी तेथे ८० हजार रुपयांच्या नोटा, एच. पी. कलर प्रिंटर, कटर, पट्टी, कागदावर बनवलेल्या अर्धवट नोटा तसेच नोटा बनवण्याचे इतर साहित्य आढळून आले. यात एकुण ७ जणांना अटक करण्यात आली असून एकुण ४ लाख रूपयांच्या बनावट नोटा पोलीसांनी हस्तगत केले आहे. अजून या प्रकरणात किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहे.


Protected Content

Play sound