अज्ञात वाहनाची ट्रकला जोरदार धडक; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद टोल नाक्याजवळ अज्ञात वाहनाची ट्रकला जोरदार धडक दिल्याने ट्रकचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी साडेचार वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबबात अधिक असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्यावरील महामार्गावरून ट्रक क्रमांक (जीजे २७ यु ९२८४) हा ट्रक शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता जळगावकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर अज्ञात चालक हा वाहन घेवून पसार झाला. त्यानंतर ट्रकचालक अनिल ब्रिजभान जैस्वाल वय ४५ रा. बरधावना जि.नागपूर याने नशिराबाद पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४.३० वाजता नशिराबाद पोलीसात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख हे करीत आहे.

Protected Content