जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दि येथिल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व क्वीक हिल फाउंडेशन व महाराष्ट्र सायबर सेफ पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षेसाठी सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या सायबर क्लबचे विद्यार्थी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत आहेत.भारतातील हा सायबर सुरक्षे बाबत जनजागृती फार मोठा उपक्रम क्वीक हिल फाउंडेशने सन २०१८ पासून सुरू केलेला आहे.
या उपक्रमांतर्गत आज, १९ जुलै रोजी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणक प्रशाळेची विद्यार्थी जान्हवी सपकाळे आणि नेहा पाटील या विद्यार्थिनींनी अनुभूती सेकंडरी स्कूल, जळगाव येथे जाऊन विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती सत्राचे आयोजन केले. या सत्रात सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फसवणुकीपासून बचाव, पासवर्ड सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

हे सत्र विद्यापीठातील समन्वयक राजू आमले सर, तसेच क्वीक हिल फाउंडेशनच्या गायत्री केशकर मॅडम आणि दीपू सिंह सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अशा उपक्रमांमुळे सायबर जागरूकता वाढीस लागते, असे आयोजकांनी सांगितले



