Home Cities रावेर धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शैक्षणिक उपक्रमाव्यतिरिक्त महाविद्यालयातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणे गरजेचे असे प्रतिपादन डॉ. पद्माकर पाटील यांनी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात १९ जानेवारी रोजी विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित विद्यापीठस्तरीय तीन दिवसीय व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेत केले.

तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनचे वक्ते डॉ.रफिक जमील शेख, यांनी “राष्ट्र उभारणीसाठी युवा नेतृत्वाची गरज” या विषयावर मार्गदर्शन केले डॉ. शेख यांनी युवा हा राष्ट्राचा कणा आहे, युवकांनी सामाजिक भान आणि बांधिलकी ठेवून आपले आदर्श निवडावे आणि जीवनात सत्य,चिकाटी व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहावे, दरम्यान अनेक उदाहरणे देत त्यांनी आजच्या युवकांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले. दुसरे वक्ते विशाल पाटील (पोलीस निरीक्षक सावदा), यांनी “टीमवर्क आणि नेतृत्वापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन केले पोलीस अधिकारी म्हणून काम करताना टीम वर्क किती महत्त्वाचे आहे या विषयी अनेक अनुभव त्यांनी यावेळी सांगितले तसेच कायदा आणि सुव्यवस्था विषयी माहिती देत गुन्हेगारी व सामाजिक वाद मिटवण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करावे, कोणते कायदे कोणत्या वेळी अमलात आणले जातात त्याची प्रक्रिया काय हे सांगत युवकांना ट्राफिक कंट्रोल विषयीचे नियमांचेही धडे दिले.

दुपारी 3 वाजता कार्यशाळेचा समारोप समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे व प्रमुख पाहुणे डॉ.पी.डी.पाटील (सिनेट सदस्य कबचौउमवि,जळगाव होते यावेळी. मंचावर कार्यशाळेचे समन्वयक विद्यार्थी डॉ.विजय सोनजे,त्यांचे सहकारी प्रा.अचल भोगे, डॉ.जयश्री पाटील, डॉ.शिवाजी मगर, डॉ. विकास वाघुळदे, प्रा.आरती भिडे, प्रा.पल्लवी तायडे प्रा.राकेश तळेले, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिन्ही जिल्ह्यातून विविध महाविद्यालयातून कार्यशाळेसाठी सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. समारोप सत्राचे सूत्रसंचालन कुमारी छाया शिरसाळे यांनी व आभार चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थी आदित्य बिऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.ताराचंद सावसाकडे,श्रीराम कोळी, धनंजय माळी, भूषण चौधरी विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनीनी अहोरात्र मेहनत घेऊन सहकार्य केले.


Protected Content

Play sound