शनिवारी विद्यापीठ कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर

nmu

जळगाव (प्रतिनिधी) :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना, उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय संघटना, व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम ह्या संघटनेतर्फे विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य तातडीच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी उद्या शनिवार दि.२९ जून रोजी विद्यापीठातील कर्मचारी – अधिकारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार असल्याचे प्रसिद्धिपत्राद्वारे कळविले आहे

गेल्या पंचवीस दिवसांपासून राज्यातील अकृषि विद्यापीठांमध्ये या मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. निवेदन, काळ्या फिती लावणे, दररोज मध्यंतरात निदर्शने, व विभागीय सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, पुणे संचालक कार्यालयावर मोर्चा या टप्यांद्वारे आंदोलन करण्यात आले असून आता पुढचा टप्पा म्हणून उद्या शनिवारी विद्यापीठातील सर्व कर्मचारी लाक्षणिक संपावर आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जवळपास ४५० अधिकारी-कर्मचारी संपावर जाणार असून उद्या विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय काम ठप्प होणार आहे. उद्या सकाळी प्रशासकीय इमारती समोर सर्व कर्मचारी एकत्र येऊन घोषणा देणार असून काम बंद ठेवणार आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास १५ जूलै पासून कोणत्याही क्षणी बेमुदत संप पुकारला जाणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर अरूण मुरलीधर सपकाळे, जयंत रामदास सोनवणे, रमेश डोंगर शिंदे, राजू रतन सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content