विद्यापीठ कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; चार लाखांचा मुद्देमाल लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ कर्मचारी निवासस्थानात कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ९८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविंद्र पांडूरंग गायकवाड (वय-५१) रा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी निवासस्थान बांभोरी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ते विद्यापीठात नोकरीला आहे. २४ मे रोजी रात्री ११ ते २५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ३ लाख ८९ हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि ९ हजार ५०० रूपयांची रोकड असा एकुण ३ लाख ९८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने चोरून नेला. याप्रकरणी रविंद्र गायकवाड यांनी पाळधी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.

Protected Content