
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रथितयश चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या चित्रप्रदर्शनास आज युनिटी क्लबच्या सदस्यांनी कलादालनास भेट देत पाहणी केली. धर्मराज खैरनार यांनी आपल्या कुंचल्यातून चाळीसगाव परिसरातील धार्मिक,ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांसोबत व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत. त्यांनी रेखाटलेली चित्रे ही दृष्टिक्षेपात भर टाकणारी राहिली आहेत. या औचित्यपर त्यांनी जलसाक्षर अभियान आणि युनिटी क्लबच्या माध्यमातून समाजहीत कार्य करणारे स्वप्नील कोतकर यांच्यावरील रेखाटलेल्या चित्राची भेट यावेळी त्यांनी सुपूर्द केली.
धर्मराज खैरनार यांच्या कलादालनास आज युनिटी क्लबच्या सदस्यांनी भेट दिली. धर्मराज खैरनार यांनी जगण्याच्या अनुभवांना रंगांनी आकार घेत कलाकृतीची निर्मिती केलीय. यात दर्शनीय कलेच्या सान्निध्यातील छायाचित्रे ही मन मोहून टाकणारी राहिली आहेत. यावेळी एक अप्रतिम अशी रंग अनुभूती घेत असतांनाच चित्रकार धर्मराज खैरनार यांनी कलदालनाची माहिती दिली आणि त्यांच्या कला प्रवासाचा परिचय करुन दिला. तर युनिटी क्लबच्या सदस्यांनी धर्मराज यांनी रेखाटलेल्या लयदार रेषा आणि रंगाची छटा चित्रातील सौंदर्यात भर टाकणारी आहेत. कलाशिक्षकाच्या माध्यमातून आत्मानंदाची अनुभूती अन त्यांची सृजनात्मक वाटचाल गौरवास्पद असल्याचे सांगितले.
धर्मराज खैरनार यांनी साकारलेली चित्रे ही मनास सुखावणारी असून एका अनोख्या कलाप्रदर्शनात स्वतःला हरवून गेल्यासारखे वाटले. अप्रतिम अशी रंग अनुभूती,लयदार रेषा आणि रंगाची छटा चित्रातील सौंदर्यात भर टाकणारी आहेत. कलाशिक्षकाच्या माध्यमातून आत्मानंदाची अनुभूती अन त्यांची सृजनात्मक वाटचाल गौरवास्पद आहे, असेही यावेळी युनिटी क्लबच्या सदस्यांनी म्हटले. यावेळी मनीष मेहता,गितेश कोटस्थाने,गणेश सुर्यवंशी,निशांत पाठक,स्वप्निल धामणे,राकेश राखुंडे,पियुष सोनगीरे,विशाल गोरे,मनीष ब्राह्मणकर,स्वप्निल कोतकर आदी उपस्थित होते.