भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेवून रेल्वे संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक इती पाण्डेय यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरूवातीला इती पाण्डे यांनी रेल्वे विभागात सुरू असलेल्या आणि पुर्ण झालेल्या पायाभूत सुविधा संदर्भात सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना दिली. यात विविध रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशन आणि स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी रोड अंडर पास, रोड ओव्हर ब्रीज, पाचोरा जामनेर बोदवड रेल्वे कामाचा आढावा, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मलकापूर, नांदुरा ,रावेर येथील सुरु असलेले रेल्वे काम, पिंपळगाव येथील जमीन अधिग्रहण, तसेच खंडवा-सनावद मेमू रेल्वे संदर्भात चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांची कामे जलद गतीने करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिल्या. ता रेल्वे विभागीय नियंत्रण कार्यालयाला भेट देवून निरीक्षक करत माहिती जाणून घेतली. या बैठकीला अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम. के. मीना आदी उपस्थित होते.