Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय फैजपूरच्या प्रस्तावित प्रांताधिकारी कार्यालयाची केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून पाहणी !

फैजपूरच्या प्रस्तावित प्रांताधिकारी कार्यालयाची केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून पाहणी !


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फैजपूर तालुका यावल येथे प्रस्तावित प्रांताधिकारी कार्यालयासाठी असलेल्या जागेची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान, वापरात नसलेली व जिर्णावस्थेतील शाळेची इमारत पाडून कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला
मा. मंत्री महोदयांनी पाहणीदरम्यान स्पष्ट निर्देश दिले की शाळेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही प्रस्तावित कार्यालयाच्या बांधकामापूर्वी शाळेच्या सुरक्षिततेसाठी कंपाऊंड वॉल उभारण्यात येईल तसेच शाळेच्या खेळाच्या मैदानाचे क्षेत्र सुरक्षित ठेवण्यात येईल.

या निर्णयामुळे तालुक्यातील प्रशासनिक सुविधा अधिक सुलभ व कार्यक्षम होतील तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण व क्रीडा उपक्रम अखंडित आणि सुरक्षित पद्धतीने सुरू राहतील जळगाव जिल्ह्यात विकास आणि शिक्षणाचा सुंदर समतोल साधणारा हा उपक्रम स्थानिक नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे


Protected Content

Play sound