बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर एका ४० वर्षीय अनोळखी तरूण बेशुध्दावस्थेत आढळून आल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास एक अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरूण हा बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. त्याला काही सुज्ञ नागरीकांनी उचलून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना तरूणाचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. पुढील तपास रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content