चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळील रेल्वे स्टेशन पासून जवळ असलेल्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरूवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ३३१ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात गेटमन प्रवीण चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. आणि मृतदेह ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजय मालचे हे करीत आहे.




