जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथील मामा भांजे हॉटेल समोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकत दुचाकीस्वार तरूण हा गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत विजय पाटील वय १९ रा.गोराडखेडा ता.पाचोरा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
निशांत पाटील हा तरूण २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगावकडून पाचोरा रस्त्याने जात असतांना रस्त्यावरील वावडदा गावाजवळील मामा भांजे हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत निशांत हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी अखेर चौकशी अंती गुरूवारी ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.