जळगाव प्रतिनिधी | शहरातील केळकर मार्केटजवळ एका ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील केळकर मार्केट येथे ८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. शहर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला, मात्र अद्यापपर्यंत नातेवाईकांचा शोध घेवूनही कुणी आढळून आलेले नाही. दरम्यान हा इसम तांबापुर परिसरातील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.का. सुरेश पाटील आणि पो.ना. प्रदीप पाटील हे करीत आहेत.