वरणगाव येथे धावत्या रेल्वे गाडीतून अनोळखी इसमाचा पडून मृत्यू

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव-भुसावळ अप रेल्वेलाईन खांब नंबर ४५२/२३,२५मध्ये एक अनोळखी इसम कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडून मयत अवस्थेत मिळून आल्याची घटना दि २३ रविवार रोजी उघळकीस आल्याने वरणगाव पोलिसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहीती अशी की, रेल्वे स्टेशनच्या पाचशे मिटर अतंराजवळ कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून एक अनोळखी इसम पडून मृत्यू झाला आहे अदांजे वय ३५,३६ नाव गाव माहीत नाही. गाडीतून पडून हाताला, पोटाला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे. संतोष चौधरी बी डब्लू आय रेल्वे कर्मचारी यांचे खबरदारीवरून वरणगाव पोलिसात आकस मास मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे करीत आहे. अनोळखी इसमाची आळख पटवीण्याचे पोलिसांनी आवाहान केले आहे.

 

Protected Content