जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद रस्त्यावरील रेल्वे पुलावर अनोळखी इसमाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी पोलिसांना आढळून आला. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिपेठ- ममुराबाद रस्त्यावर असलेल्या लेंडी नाल्याजवळील रेल्वे पुरावरच्या खांबा क्रमांक 420/28 जवळ शनिपेठ पोलिसांना अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीत मृतदेहाच्या डोक्याला गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अद्याप प्रौढाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह किरण वानखेडे, राहुल घेठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.