जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एक अनोळखी व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव ते भादली रेल्वेच्या दरम्यान सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२४च्या २२ आणि २४ जवळ एका अनोळखी अंदाजे ५० ते ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याचे समोर आले. यावेळी लोको पायलट गुलाम सरोवर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मयताची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती व वस्तू मिळाली नाही. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहे.




