दुदैवी घटना : गोंडस मुलीला जन्म देवून मातेने घेतला जगाचा निरोप !; चार लेकरं झाली पोरकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रसुती झाल्यानंतर गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले आहे. याप्रकरणी पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. नबाबाई समीर पावरा वय २८ रा. कुंड्यापाणी ता. चोपडा असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी या आदीवासी पाड्यावर नबाबाई पावरा या विवाहिता आपले पती आणि तीन मुलांसह वास्तव्याला होत्या. रविवारी १९ मे रोजी सकाळी ९.३० वाजता विवाहिता घरी असतांना त्यांची प्रसुती कळा जानवायला लागले. त्यानंतर त्यांनी काहीवेळात गोंडस मुलीला जन्म दिली. त्यानंतर दुपारी १२ वाजता विवाहितेची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी वाहनातून धानोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या विवाहितेवर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना दुपारी दीड वाजता विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी विवाहितेच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. विवाहितेचरूा पश्चात पती समीर, तीन मुले- अनिकेत, आयुष आणि अंकीत आणि नुकतेच जन्माला आलेले गोंडस मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content