भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गडकरी नगरात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीवर काम करत असतांना तोल जावून खाली पडल्याने वसंत चावदस मोरे वय ५० रा. कासवा ता. भुसावळ या मजूराचा दुदैवी मृत्यू झाल्याची धटना शनिवारी ११ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वसंत चावदस मोरे हे आपल्या कुटुंबासह भुसावळ तालुक्यातील कासवा येथे पत्नी, मुलगा, दोन मुली यांच्यासोबत वास्तव्याला होते. जळगाव शहरातील गडकरी नगरात अमृत योजनेच्या माध्यमातून जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. ते दररोज अप-डाऊन करीत काम करीत होते. शनिवारी ११ मे रोजी सुध्दा ते कामावर सकाळीच ९ वाजता आले होते. सकाळी ११ वाजता ते काम करत असतांना त्यांचा तोल जावून पाण्याच्या टाकीवरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. टाकीच्या स्लॅबचे काम करीत असतांना ही घटना घडली.
यावेळी त्यांना सुरक्षेचे काहीही कवच नव्हते. डोक्यात हेल्मेट नाही, संरक्षण पट्टा नाही, सुमारे ७० फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या या जलकुंभावरून मोरे खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे एकाच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.